मराठी
६९७. चतुर्थोद्गार
परमेश्वरा, करुणाकरा
तव आसरा तुटला पुरा ... ध्रु
त्यजिलें मला का अजि देव बापा
तुजविण झाला जीव घाबरा ... १
घन अंधकारें जग व्याप्त सारें
हृदयामंधींहीं भरला पुरा ... २
तुझिया मुखाचें दुरी तेज होतां
मज मृत्यू वाटे जणूं दुसरा ... ३
जगणें अजाणें कसें बालकानें
जरी मे लोटी दुरी लेकरा ... ४
दुरितीं दुरावे जन ईश्वराने
शिकवी धडा हा मज पामरा ... ५
---- ना. दा. पंडित