६९८. पंचमोदगार

मराठी

६९८. पंचमोदगार पाप्यासाठीं स्वयें केलें प्रायश्चित्त जाहला तुषार्त क्रुसावरी ... १ जलाशय केले ज्याने उत्पन्न लागली तहान त्यासी फार ... २ साधीसुधी नोहे प्रभूची तहान भरला महान अर्थ त्यांत ... ३ नम्रतेनें जावें तयासी शरण करावें स्वार्पण आनंदाने ... ४ ठेवावे निर्मल उच्चार आचार घ्यावा समाचार दुर्बलांचा ... ५ अंतरीं ख्रिस्ताला द्यावें श्रेष्ठ स्थान शुभवर्तमान, गाजवावें ... ६ ------------- वा. म. गद्रे