मराठी
६९९. षष्टोदगार
क्रुसावरी ख्रिस्तवाणी
शास्त्रलेख आदरोनि ... १
वदे पूर्ण झाले आतां
केला समर्पण आत्मा ... २
आला अमुचा हा सण
नांव ज्याचें वल्हांडण ... ३
होते, पक्षी, मेंढे, खोंड
यज्ञ यांचे करी रद्द ... ४
यज्ञपशु स्वयें ख्रिस्त
मारे ताराया समस्त ... ५
ठेवा भाव त्याचेवरी
नको व्हाया नाश तरी ... ६
झाला याजक देवपुत्र
स्थानीं परमपवित्र ... ७
जाई तेथें एकदाच
नाही पापें सदाचीच ... ८
ख्रिस्त बोले यहुद्यांना
मोडा मंदिर हे, जाणा ... ९
तीन दिनांत हें बांधीन
शिष्य स्मरती तो दिन ... १०
बोले ख्रिस्त क्रुसावरी
पूर्ण झालें आहे तरी ... ११
------------------ भा. गि. चांदेकर