७००. सप्तमोदगार

मराठी

७००. सप्तमोदगार प्रीति नाम सार्थ जयास तोच ख्रिस्त खिळीती क्रुसास ... ध्रु दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी अंधार वेढी जगताला घनघोर मेघ गगनांत अडविती सूर्यतेजाला स्तबधता भयानक भारी थरकांप पृथ्वीचा झाला . भीतीचे सुटले वारे जनमनांत भीती पसरे भीतीमय होई सारे पाहून तया दृश्यास खिळीलेला ख्रिस्त क्रुसास ... १ निस्वार्थ प्रेम माराया स्वार्थीजन घालिती धाव निष्कलंक देह वधून दुष्टानि साधला डाव सत्तेच्या जोरावर हो बुडविली नीतीची नावं तरी दिसे शांती प्रभूवदनीं दिव्य तेज होते नयनी, विश्वाची चिंताहि मनीं उद्धरावया दिनांतें वरी येशू क्रुसखांबास ... २ लोकांची येउन किंव एकवार त्यांना बघतो स्वर्गाशीं दृष्टी जडली शेवटीं असे वदला तो हे बापा, मी मम आत्मा तव हातीं सोपून देतों मग हळुचं पडलीं मान, सोडिलां येशूने प्राण, जाहला प्रभूत विलीन खंडून घेई आम्हांस साहून क्रूसमरणास ... ३ ----------- जॉन मुळे