मराठी
७०३. तुझें मरण
तुझ्या मरणांत पाप्यांचे तारण
झालें उच्चाट्न पापांचें तें ... १
तुझ्या मरणांत संतांची उत्पत्ती
धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता ... २
तुझ्या मरणांत क्रांतीचा उगम
प्रीतीचा संगम कितीत गोड ... ३
तुझ्या मरणांत ध्येयाची पूर्तता
सारी अपूर्णता नष्ट झाली ... ४
उनाड लेंकरूं म्हणे आर्जवून
तुझें ते मरण येवो मला ... ५
---------------- शा. स. ठोकळ