मराठी
७०४. जाहलो नवीन
करा जयकार प्रभुजी उठला
विजयी जाहला मृत्युवरीं ... १
कुठें मोह पापें वसली दडून,
पळाला सैतान कुठे आतां ... २
कुठें तो अंधार कुठें त्याचा त्रास
सृष्टींत प्रकाश दाटलां हा ... ३
गेलें कुठें आतां निंदकाचें तोंड
कंबरेच्या धोंड बाजू होता ... ४
कुठे जुनेपण जाहालो नवीन
साधिलें तारण ख्रिस्ताद्वारे ... ५
विजय, विजय हृदयी विजय
करा जय जय महाघोषें ... ६
------- के . स. ठोकळ