मराठी
७०५. कोण असा बलवान
अमुचा येशू ख्रिस्त भगवान ... ध्रु
पाप जगाचें घेऊनि शिरी
अर्पूनि प्राणां जगतां तयारी
धन्य प्रभू येशू अवतारी
देवाचा सूत जाण ... १
जगतासाठीं स्तंभी चढला
पाप जगाचें घेऊनि गेला
मरणावरतीं विजयी झाला
कोण असा बलवान ... २
पाषाणांच्या ठिकऱ्या झाल्या
चहुबाजुंनी विजा चमकल्या
भूमी हादरूनी थडीं उघडल्या
कडकडले अस्मान ... ३
दुःखाची हि कथा संपली
तिसऱ्या दिवशी पहाट झाली
सृष्टी आनंदाने फुलली
झालें पुनरुत्थान ... ४
------ एस. आर. पवार