मराठी
७०६. उठला प्रभुराया उठला
या जयजय बोला,
उठला प्रभुराया उठला ... ध्रु
ह्या मृत्युंजय प्रभुख्रिस्ताला
काल ग्रहण लागल्या रवीला
उजळा नव आला
उठला प्रभुराया उठला ... १
सर्व जगाचा भार उतरिला
ह्या जगताच्या जिंकून अरीला,
जिंकून मरणाला
उठला प्रभुराया उठला ... २
द्वेष, राग, मत्सरादी याला
पायांखाली तुडवीत आला
प्रेमाचा पुतळा
उठला प्रभुराया उठला ... ३
पुन्हा एकदां हृदयामधला
प्रभू अमुचा तो तिथें उतरला,
पुढें नित्य वसला
उठला प्रभुराया उठला ... ४
----- दे. ना. टिळक