मराठी
७०७. पुनरुत्थानाची ग्वाही
प्रेमभरे पाहूं प्रभूला ... ध्रु
कालच नेत्रें भरुनी आलीं
अश्रू पाहुनी धरणी भिजली,
आज परी तीं सुमनें झाली
तिचं तया वाहू ... १
हा मेलेला प्रभू उठला ना,
ऐका घेती दुतही ताना
या हो या, ह्या दिव्या गाना
सूर मिळवा पाहुं ... २
किती शतकांची शीला लोटली
किती शतकांची निद्रा आली
अवनी सारी जणू मेलेली
चला तिला उठवुं ... ३
डौले झेंडा विजयी फडकवू
दाही दिशांना द्वाही फिरवूं
शूर शिपायी त्याचें मिरवूं
शत्रू चला हरवु ... ४
-------------- दे. ना. टिळक