मराठी
७०९. पुनरुत्थान
पुन्हां हासला अंबरी चंद्रमा तो,
पुन्हां दूर गेले पहा मेघ ते
पुन्हा दाविती तारका सानुल्या सानुली
आपुली आननें सस्मितें
पुन्हां दूर अंधार तो दुष्ट
गेला कुठें काननीं तो मुखा लोपवी
पुन्हां एकदां शुभ्रसें वस्त्र
ल्याली रसा हृष्ट झाली
मना तोपवी ... १
पुन्हा जाती सारीं सुकोनी
क्षणार्धात गालांवरी गालींची आसवें
पुन्हां खेळते रम्य ते हास्य
तेथें पुन्हां देई चैतन्य आस्थां नावें
पुन्हां दाटले सौख्य पृथ्वीवरी
आज शोकाश्रूसिंधु पुन्हा आटला
लये स्वर्ग खाली हळू प्रेमभारें
पुन्हा चुंबण्या लाडज्या भूमीला ... २
करूं नर्तन गायन, विस्मरू आपणा,
आज हर्षास नाही मिती
प्रभूचें शिपायिं चाला गौरवू तया,
चला आपला शूर सेनापती
जयी आज झाला अहा ख्रिस्त येशू ,
निमाली पहा भीती सारी खरी
जरा मृत्यू मोहादी आराती
सारे पराभूत झाले, पळाले दुरी ... ३
पहा उर्मी आल्या सुखाच्या,
सुखाने तिन्ही लोक त्यास लीलया मारीती
पुन्हा उठला ख्रिस्त त्याचें
यशोगीत गाती धरा त्यासवें डोलती ... ४
------- अ. दे. टिळक