मराठी
७१०. पहाट झाल्यावरी
पहाट झाल्यावरी
शोधूनि शोधूनि थकले भारी
पहाट झाल्यावरी ... ध्रु
करुन आले सर्व तयारी
ध्यास लागला तुझा अंतरी
कोठें प्रभू कुणी सांगा तरी
शांत जिवा या कोण करी
पहाट झाल्यावरी ... १
धावत आले मी अनवाणी
तुजसाठी झालें दिनवाणी
जाऊ कुठें मी अधांतरी
पुसूं कुणाला या प्रहरिं
पहाट झाल्यावरी ... २
देवदूतांचे वाचन खरे का,
घेऊन गेलें कुणी दुसरे का
परतुनी पाही माघारी
निज भक्तांचा कैवारी
पहाट झाल्यावरी ... ३
प्रेमळ वाणी ख्रिस्त हाकारी
प्रभू वचनांची आठवण करी
दर्शन प्रभूचें प्रथम करी
मारियेची पुण्याई पुरी
पहाट झाल्यावरी ... ४
-------- एस. आर. पवार