मराठी
७११. ख्रिस्त येईल पुन्हा तैं
मृत्यूच्छाया नाहीं तै राहणार
मृत्यूच्छाया नाहीं तै राहणार
दुःख लवलाही विसरणार
ख्रिस्त येईल पुन्हा तै ... १
ख्रिस्त येईल पुन्हा तैं,
ख्रिस्त येईल पुन्हा तैं,
दुःख लवलाही विसरणार
ख्रिस्त येईल पुन्हा तै ... ध्रु
भवकष्ट हानी तै सरणार
भवकष्ट हानी तै सरणार
नवें गीत कानी हो पडणार
ख्रिस्त येईल पुन्हा तै ... २
नाहीं धास्ती, भय तैं वाटणार
नाहीं धास्ती, भय तैं वाटणार
जय जय जय, हो जयकार
ख्रिस्त येईल पुन्हा तै ... ३
भेट सुप्रियांची तैं साधणार
भेट सुप्रियांची तैं साधणार
किती आनंदाची न पारावार
ख्रिस्त येईल पुन्हा तै ... ४
--------- डब्ल्यू . जे. रॅमसे