मराठी
७१२. प्रभुभोजन
या, बसा, करा मम स्मरणा,
प्रीतिभोजन
वाढिलें तुम्हां मीं माझ्या
प्राणजीवना ... ध्रु
एक मेज एकचि पेला
एक भाकरी सगळ्यांला
त्र्येक देव बघुनी घाला
मोक्षसाधना ... १
भाकरी तनु घ्या माझी
अर्पिली तुम्हां हि आजी
सेवुनि बना रणगाजी
लोकतारणा ... २
रुधिर जीवनाचें पाणी
भागवी तृषा भवरानी
प्राशुनी सुखें गा, गानीं
अमर भावना ... ३
मलीन वस्त्र जीवात्म्याचें
रूप धूवुनी, घ्या पुण्याचें
धूळ सांचलीं नित, नाचे
देहवासना ... ४
घ्या शिरी न केवळ शापा
पूर्ण करुनि पश्चातापा
तोषवा नभीच्या वापा
पापमोचना ... ५
------ वा. स. निर्मळकर