मराठी
७१३. गूढ भोजन
श्रीख्रिस्ताच्या सच्छिषयांनो,
गूढ भोजना चला करा
व्यक्त करा या विश्वासाला
प्रभूवचनाला स्मरा, स्मरा ... ध्रु
मम मरणि दिग्दर्शित प्रेमा
स्मरुनी ह्या भोजना करा
प्रेमपूर्ण वाणी हि प्रभूची
अनन्यभावें मनीं धरा
आपण प्रभूचे, निज रुधिराने
विकत घेत तो अपणांला,
प्रभू आपला विश्वासाने
हें भोजन दावीं सकलां ... १
उभवुनी झेंडा प्रभुनामाचा
घालूं चला सांष्टांगाला
सत्यव्रत साक्षीजन आपण
अनुसरतों प्रभुपदकमला
करून भोजना अपुली श्रद्धा
प्रभूवचनांवर दावूं चला
ख्रिस्तावर विश्वास आपला
प्रमाण पटवु जगताला ... २
विभाग आपण भक्तगणाचें
भूस्वार्गी जो वास करी
त्यामाजी अधिकार तसा सहभाग
विधी हा व्यक्त करीं
हिंदवासीं प्रभूभक्तजनांचे
एकच मंडळ भाव धरूं
ख्रिस्त सखा राजेश्वर अपुला
दर्शित भोजन करून करूं ... ३
----- सु. ना. थोरात