मराठी
७१५. सार्वत्रिक आनंद
ह्या ढगाढगांनी तेज काय पांघरीलें
कटू कंटकवृक्षही फुलले
रजनीला हास्य मधू आले
सृष्टीला लाविला प्रेमतिलक प्रेमलें ... १
आकाशामधली गंगा पुनीत झाली,
मागीस दिशा लाविली,
ती स्वारी स्नाना आली,
तेज तें दिपवितें सर्व तारकावली ... २
हि स्वर्ग धरेला एक करिति मधू गानें
दिव्यदूत दिव्य सुराने,
मेषपाल आनंदाने,
गाती हो नाचती, देती येशूला मनें ... ३
------ दे. ना. टिळक