मराठी
७१६. गोठ्यांत जन्मला बाळ
पूर्णत्वाला येई काळ,
गोठ्यात जन्मला येशू बाळ ... ध्रु
मांगल्याची प्रभा फाकली
आनंदाने धरा नाहली
प्रेमाब्धिला भरती आली
जयघोषाने नाचे आभाळ
गोठ्यांत जन्मला बाळ ... १
धन्य कूस मार्येची होई
देवप्रीतिची गाणीं गाई
येशूबाळा ती अंगाई
उजळलें दुनियेचे भाळ
गोठ्यांत जन्मला बाळ ... २
--------- इ. इ. सुरेंद्र