७१८. ख्रिस्तजन्मगीत

मराठी

७१८. ख्रिस्तजन्मगीत अभिनव हें गात गान विश्व सकल डोले ... ध्रु देह धरीत रिद्धीसिद्धी प्रगटे वा सुखसमृद्धी गाई म्हणून मनुजबुद्धी ख्रिस्तजन्म झालें अभिनव इ. ... १ भक्तवृन्द हर्षभरित आनंदें गगन भरीत घोष मुदा काय करीत ख्रिस्तजन्म झालें अभिनव इ. ... २ विसरुनिया भेदभाव जातीधर्म नांव गांव वदती आज रंक राव ख्रिस्तजन्म झालें अभिनव इ. ... ३ आशेच्या आंदोली मानुषता बसलेली गीत गात हेंच भली ख्रिस्तजन्म झालें अभिनव इ. ... ४ धन्य धन्य मरियासुत वंदूं चला पुण्यचरित आपणही गात गात ख्रिस्तजन्म झालें अभिनव इ. ... ५ ------- शा. द. उजगरे