७१९. पूर्वेकडील तारा

मराठी

७१९. पूर्वेकडील तारा आज नवलाचा नभीं एक तारा पूर्व बाजूला चमकतसें न्यारा भालदारच तो विश्वी करी पहारा जरीपटक्याचा सोडूनि पिसारा ... १ येति जे जे प्रभूंबाळ दर्शनाला भेट घेऊनिया राजकुमाराला चालतो तो त्यापुढें कसा नीट बेथलेहेमी गोठ्याची दावी वाट ... २ धन्य ताऱ्या तुन विश्वभालदार तूंच दावोनी जगा तारणार लुप्त झालासी कसा दृष्टीआड वाट गवसेना पापतमी गाढ ... ३ भालदारी हि रीती पडे देवा तुला कोणी तरी दास नवा व्हावा भालदारी हि दीन बालकाला देईं, अर्जी तव पदीं विश्वपाला ... ४ ----------- स. ना. देठे