७२०. प्रेम जन्मतां

मराठी

७२०. प्रेम जन्मतां बेथलेमगांव ख्रिस्त जन्मला गव्हाणीमाजीं निजूं लागला मार्या अंगाई गाते त्याजला निज सानुल्या माझ्या सोनुल्या जो जो रे जो जो चंद्र आकाशीं तारे हांसती गरिबी अपुली म्हणुनी किती राजसा गाडे झाकू दे बाळा निज जरासा गातें तुजला जो जो रे जो जो गाईगुरांचें स्थान मिकार प्रेम जन्मतां स्वर्ग सुंदर होतें, दूतांचे संगीत छान ऐकेल जग तेथें रमून जो जो रे जो जो दिव्य अंगणी खुलेल रूप सांडीत येतां जगिं अमूप सृष्टीं हांसुनी सांगतें जप फुल ग माझें प्रेमस्वरूप जो जो रे जो जो तृण रचुनी शयन केलें लत्करीं कसें बाळा झोपलें नको ग बाई ये राजा इथें मन्मन कमलीं ठेवूं म्हणते, जो जो रे जो जो ---------- सु. धो. रामटेके