७२१. तारक बालक

मराठी

७२१. तारक बालक कृपेचा सिंधू सांपडला तारक बालक, श्रीयेशू हा जगतीं अवतरला ... ध्रु संघ हा दूतांचा जमला मंगल वार्ता, गरिब मेंढक्या विदित करायाला ... १ जयाचा ध्वनी एकच उठला शांती, कृपा मनुजावरी गौरव देवाबापाला ... २ प्रीतीला पूर कसा आला अहा धरी कवटाळून प्रीती भणंग दुबळ्याला ... ३ बालक अर्पी जगताला, नवजीवनाचा, ठेवा यास्तव आनंदें डोला ... ४ --- वि. कृ. गायकवाड