मराठी
७२२. श्रीख्रिस्तास नमन
ख्रिस्ताला अजि नमन करूं या ... ध्रु
ग्रहगोलांवर ज्याची सत्ता
एडिन ठेवूं तयाच्या माथा
भक्तिभाव भोळा माझ्या राजा तुला
अर्पू वैंखरी या .. १
अळवाया नाहीं रे संगीत
घेई ऐकुनी बोबडें गीत
शुद्ध ठेवूं मन गाऊं तुझें गान
माझा प्रभुराया ... २
भावनेचा करुनिया मेला
तुला स्तवाया खुला गळा केला
झालों भजनी दंग तुझया नादीं गुंग
देईं साथ गाया ... ३
----------- विश्वासकुमार