७२४. प्रभूवराला पाहुं

मराठी

७२४. प्रभूवराला पाहुं घेऊन मशाली बेथलहेमा जाऊं नुकताच जन्मला प्रभूवर त्याला पाहूं ... १ अजुनीही आहे निज तयाचे नयनीं आळवूं तयाला गाउन सुंदर गाणीं ... २ हा जगतासाठी करील निज बलिदान हा म्हण परी हो सर्वाहून लहान ... ३ हि प्रेममूर्ती ये बालक होऊन आज हा मानवतेवर चढवाया शिरताज ... ४ --------------------- गोपीनाथ तळवलकर