७२५. ख्रिस्तजयंती

मराठी

७२५. ख्रिस्तजयंती चिरंजीव जगिं नाम प्रभूचें राजांच्या मम प्रभुराजाचें ... ध्रु बेथलहेमी जन्मा येई सकळ जगाचा राजा असुनी मी पण अवघे विसरुनी जाई ... १ गोष्ट जुनी हि ठावें सकलां नवीच ती परी गमे आजला निरखून पाहू प्रभुराजाला ... २ मम हृदयिं कल्लोळ मातला अंतःकरणी बाळा चिमुकला हाले प्रभूचा इवला झोला ... ३ तव जन्मानें प्रकाश आला अंधकार तो विलया गेला प्रीत कशी ती उमगे सकलां ... ४ आम्हांकरितां जन्मा आला देऊं काय मी ख्रिस्ता तुजला अर्पिन जीवित तव पदकमला ... ५ ---------------- कमल जोब