७२७. प्रभूचा पाळणा

मराठी

७२७. प्रभूचा पाळणा हलवी मना, प्रभूपाळणा हा त्यजूनि सुखातें वरी यातनांना ... ध्रु पराकारणें जो झीजवी तनुला यशोगान त्याचें मुदे गात गाना हलवी मना, प्रभूपाळणा ... १ हलवी मनातें हलवी जनातें प्रभुपायिं लावी इतरां जनांना हलवी मना, प्रभूपाळणा ... २ जगाच्या हिताचा प्रभूसेवनाचा असे पाळणा जो पटावी मनांना हलवी मना, प्रभूपाळणा ... ३ ---------- लक्ष्मीबाई टिळक