मराठी
७२८. प्रार्थना
असाच राहीन उभा तुझ्या दारीं
घाली थोडी तरी भीक मज ... १
लेंकुरपणाचा नको हक्क देऊं
किंकर मी होऊं इच्छितसें ... २
तुझ्या अनुगृहें आणीन धरेस
स्वर्गरूप खास आस माझी ... ३
बोळ निंदकाचें होतील कारण
सुमार्गा जपून चोखाळाया ... ४
उंचवि मज वा मिळवी धुळीस
तव गौरवास कारण तें ... ५
कर कानाडोळा, किती करशील
मीही भक्तीबळ दाखवीन ... ६
------ यशवंत दिवे