मराठी
७३० प्रभुवांचून शांती नाहीं
विझविल कोण मनाची आग ... ध्रु
अजून मन हें शुद्ध न झालें
दिसताति बहू डाग ... १
फारच श्रमतो मन आवरितों
परी डसतो अघनाग ... २
अंतरीं तळमळ जीव घाबरतो
होतां प्रभूचा राग ... ३
शुद्ध मानवीण लाभे कैसा
स्वर्गसुखाचा मार्ग ... ४
सद्गुरु शक्तीच शांतवी दासा
ईशपदांशी लाग ... ५
मंजुळ वाणी प्रभूची बोले
शांत करीं तूं माग ... ६
------- कृ. र. सांगळे