७३१. दीननाथा या अनाथाला तार

मराठी

७३१. दीननाथा या अनाथाला तार दीननाथा या अनाथा भवनदी पार नेई दुस्तर हा भवसिंधु तरण्या धीर देई ... ध्रु जगदारण्य पेटविलें पापाग्नीनें सारें हें तडफडती मानव ते सुटण्याचा मार्ग नाहीं ... १ कुणी ज्ञानार्जना करिती कुणी कर्मासही पाही कुणी गुरु शोधण्या फिरती निशिदिनी शांती नाही ... २ टन, मन, द्रव्य संपविलें परी आधारही नाहीं सांपडला, ओरडती, पळती, स्थैर्य नाहीं ... ३ प्रभू येशू तव नामी तारण तुष्ट कृत्याचें भय वारीं, मज तारीं संकट आज निवारी ... ४ ------- दि. मे. धिवर