मराठी
७३२. दे तव पायिं विसावां
देवा शुभचर मला असावा
द्यावा पदीं विसांवा देवा ... ध्रु
चिंतनध्यानीं तव गुणगानीं
खंड मुळीच नसावां देवा ... १
जनसेवा हि त्वत्पदसेवा
बोध मनांत ठसावां देवा ... २
मीं तू ऐसा भेद नूरावा,
दे तव पायिं विसांवा देवा ... ३
--------- वेणूबाई मोडक