मराठी
७३३. सद्गुरुशिवाय इतराची गोडी नसणें
सद्गुरूच्या भजनरंगी दंग होऊं या ... ध्रु
तच्चरणी शरण रिघूनि मोंह तोडू या
भक्ती धरुनी शांती वरुनि मुक्ती पावू या ... १
धर्मप्रिति, न्यायनीतिमार्ग सेवूं या,
षडीपुचा नाश करुनि लिन होऊं या,
तन, मन, धन अर्पुनीया धन्य होऊं या ... २
---------- एम. आर. साळवे