मराठी
७३४. ख्रिस्त बोलावितो
ऐका ख्रिस्त सांगतसे
पुन्हां या हो, या हो घरीं ... ध्रु
ओतिलें मीं सर्वांसाठीं रक्त पाहा धरेवरी
अजुनीही प्रभा त्याची, तेज पाहा अंधकारीं ... १
माझ्या जीवाहृदयांनो द्या माझी तुम्हांवरी
जाई बाळ दूरवरी माता बाही तिज परी ... २
बोलवीं मी अवघ्यांना पुन्हा या हो, पुन्हा घरीं
वाहिला मीं अवघ्यांचा खांब माझ्या खांद्यावरी ... ३
राहूं द्या रे आठवण थोडीं जरा स्वप्नीं तरी
सोडिलें मी स्वर्गसुखा तुम्हांसाठीं दैन्यवरी ... ४
------------- लक्ष्मीबाई टिळक