मराठी
७३५. माझ्या बाळपणींचा प्रभू
परमेशा मम बाळपणींच्या
प्रेमाचा एकच तूं ठेवा
पुढें शैशवीं मूर्तिमंत आनंद
एक तूं माझा देवा ... १
समक्षता तव सोबत माझी
साऱ्या दिनभर माझ्याभोवतीं
अंधकार पसरतां प्रासारें
आदरयुक्त तुझें भय रात्रीं ... २
वडील शिकवितो तुला म्हणाया
बाप मीहि अभिमानें म्हटलें
परी तुझ्या त्या दिव्य प्रितीने
मातेच्या प्रेमा लाजविले ... ३
माझ्या शिर्पाखाली घेऊनि हसत
तुझा मी झोपी जावे
झोंप न येत तोंच हसत मी
प्रेमें चुंबुनी त्या बिलगांवे ... ४
एकएकटे कधीं न वाटलें,
सदा वाटलें तू मज जवळी
सभोवतालीं भीषण शांती
असली तरीही मी मानवली ... ५
माझ्या बाळपणे पूजिलेली मूर्ती
कशी तव मीं रंगविली
आठवे न मज, आठवतें परी
ह्या मूर्तीस मीं हृदीं सांठविली ... ६
कंप मनाला सुटे कितीतरी तव
मूर्तीचे भय वाटोनि
परी कल्पना शिवली मी कधीहि,
पळून जावें तुजपासोनि ... ७
आयुमार्गीं पुढें चाललों
रूप तुझें मज उदात्त गमतें
पावित्र्याची सादर भीती वाढे,
प्रेमही मधुतम वाटे ... ८
वर्षांमागें वर्षें जाती तनु,
मन माझें वाढत आहें
माझ्या वाढीस पुरून ऊराया
प्रभूही माझा वाढत आहे ... ९
बापा बापा पवित्रता ती,
प्रेम तूझे, मज, अगम्य वाटे
धन्य धन्य मी आनंदाच्या शिखरीं,
आतां जणूं कीं नांदे ... १०
भीती गेली तिच्या पलीकडे
उदारता तेथें अवतरली
प्रेमाच्याही वरची स्थिती हि
मधुर मधुर आतां अनुभविली ... ११
हात धरुनी मज पुढें पुढें जे
दाखिव तव मुख हीच विनंती
मम आकुंचित हृदयी जरी हें
करीं इथें देवा तव वस्ती ... १२
----- no name