मराठी
७३६. ये करीं वास मम हृदयीं
ख्रिस्ता न मिळे, तुज जागा ज्या समयिं,
ये करीं वास मम हृसायिं
मम हृदयाच्या तूं हिंदोळ्यावरतीं
घे झुले मंद दिनरात्री
मम पापी गण टे नुरलें,
हृदयांतून हाकून दिधलें,
तुजसाठीं रिक्त तें केलें,
कुणीं दुष्टाने काबीज करण्यापूर्वी
ये करीं वास मम हृदयिं ... १
तुज गायीच्या गोष्ठी श्रम कितीत झालें
तरी मनास तव नच फिरलें
तव नयनांनी अधिकाधिक उधळिलें
तें तुझें तेज ना पुसलें
तेजाने पृथ्वी न्हाली,
अधिकाधिक खुलुनी गेली,
चहुंकडे पसरली लाली,
अंधार परी माझ्या मानसराज्यी
ये करीं वास मम हृदयीं ... २
ठोठावियलें, तूं मम हृदयद्वार
उघडिलें नाहीं आजवर
ठाकूनि तू का गेलासी माघारी
तुजविना कोण कैवारी
परतुनी प्रभू ये ये रे
अपराध विसरुनी सारे
हीं सताड उघडीं दारे
कुणी ह्यापुढतीं, अडविणार तुज नाहीं
ये करीं वास मम हृदयीं ... ३
------- दिवाकर पवार