७३७. येशूचा मार्ग

मराठी

७३७. येशूचा मार्ग येशूच्या मार्गे चालता सुखांत माझा प्राण तो पाप, दंडापासूनि करितो माझे प्राण जेव्हा तो माझ्यासंगती तेव्हां न भासे वाण आश्रय माझा तो खरा अजिंक्य किल्ला जाण ... १ मी माझ्याअ अंतःकरणी दिलें तयास स्थान प्रियाहूनि प्रिय मला राखीन त्याचा मान न सोडी त्याशी मी कधी बालक तैं लहान मला तृषा न बाधते, शमवितो तहान ... २ रुधिरकुंडामध्ये मी सचैल केलें स्नान पापांची सर्व मजला येतसे आतां घाण सैतानांशीं लडवाया मागें शक्ती महान करील तो खरा मला आत्म्यांत बलवान ... ३ ------------ भा. सी. समुद्रे