मराठी
७३८. ख्रिस्ताच्या प्रेमाचे रहस्य
प्रभूच्या प्रेमाचें रहस्य जाणिलें
ध्यानी मनी आले प्रेमानंदे ... १
उधळ्या मी होतो, भटक्या मी होतो
तरी गोंजारितो तुझा हस्त ... २
सदा अविचारी सदा दुराचारी
मजला सावरी तुझा हस्त ... ३
जगाच्या चिंतांनी सदा माझें ध्यान
नाहीं मुखिं नाम तुझें येई ... ४
पवित्र रक्ताने मला तारिलेंस
दिले सर्वस्वास माझ्या पायी ... ५
तुझ्या चिंतनात सर्वस्व वेचिन
दास, येशू, लीं तुझ्या पायी ... ६
---- शा. प्रे. रावडे