ख्रिस्ताचा धावा

मराठी

७४० ख्रिस्ताचा धावा संकट हें षडीपुचें ख्रिस्ता तूं निवारी मज पनीता, नरकरता आतां तूच तारी ... ध्रु दृष्टी असून अंध असें श्रवणासूनि बहिरा मी शुद्ध करीं, पाप हरिं माझें, मी भिकारी ... १ पापामाजीं आनंदे स्वछंदेही रामलों मी पडलों बा, स्वारीं तूं, आलो दीन दारीं ... २ भावरानात सांपडलो मार्ग दिसेना कुठेही अधजनिता अहि आला दंशाया विषारी ... ३ मन मंदिर हे होवो तव वसती इथें राहो तवसंगे प्रभुचरणी घेईन मी भरारी ... ४ जीवच तूंचि, मार्गहि तूं सत्य तुझ्याविना नाहीं कर मजला, तूं अपुला, संत मनो विहारी ... ५ ---------- जॉन सुळे