मराठी
७४४. देवाचें प्रेम
सुखाचे सागर माझ्या हृदयिं दाटले
देवा तुझें प्रेम अंतरी सांठलें ... १
मोदाची उकळ उसळून वर आली
ग्वाही अंतरींची नांव सुवार्ता पावली ... २
येऊं दे संकट, कडा पडूं दे तुटून
धीर अंतरींचें नाहीं जायाचे सुटून ... ३
काढीं अहंकार, करीं लिन तूं मजला
विपुल जीवन देईं आपुल्या भक्ताला ... ४
म्हणें ख्रिस्तदास, तुझी सुवार्ता सांगेन
सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन ... ५
------------------- स. ना. सूर्यवंशी