७४५. ख्रिस्त धन

मराठी

७४५. ख्रिस्त धन ख्रिस्त धन ज्याचें त्याला, उणें रे कशाचें, काळाच्या दाढेंत त्याला, भय रे कशाचें त्याला उणें रे कशाचें ... ध्रु अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशांत शोभे, पुर्णत्वात भरलें नटलें, दिव्य रूप ज्याचें, त्याला उणें रे कशाचें ... १ हीन दीन वृत्ती मेली, समर्थता तेथें भरली, दिव्यें स्फुरे अवनी दीपली, मुळच तेजाचें, त्याला उणें रे कशाचें ... २ हसें मुखिं विलसो तुझिया ख्रिस्तशिष्य मंगला धन्य धन्य जगतीं ताव रे जीवन मोलाचें, तुजला भय रे कशाचें ... 3 ---------- स. ना. सूर्यवंशी