७४६. व्यर्थची सारें प्रीतीविना

मराठी

७४६. व्यर्थची सारें प्रीतीविना व्यर्थची सारें प्रीतीविना वैभव निरस जाण मना ... ध्रु प्रितिवांचून सुंदर काया जड तें चित्रची केवळ नयना ... १ विद्या कीर्ती निष्फळ प्रितिवांचून वाजे झाँज झणाझणा ... २ देव प्रीती सृष्टी धरिते गुणरूपाला देऊन प्राणा ... ३ --------- दा. बा. भारशंकर