७४७. ख्रिस्त मार्ग

मराठी

७४७. ख्रिस्त मार्ग सदा सर्वदा ख्रिस्त येशूच्या, सवें रहाया चुकुं नका पवित्र आत्मा तोच पुरवितो ध्यानी धरा हें विसरुं नका ... ध्रु पौल महात्मा अम्हां सुचवितों, मानव भाषणी भुलूं नका दैहिक अग्रेसर जे असती त्यांना कधीहीं मानूं नका ... १ अघजनीत्वाचें कपटजाल तें, मोहक असतें, फसू नका चिंता अपुली प्रभूवर टाका, संशयकर्दमी बुडूं नका ... २ सर्व मागणी अपुली मागा, देवाजवळीं कचरूं नका रुतुनी कर्दमी जगांत तुमचें हासें करुनि घेऊं नका ... ३ मानवांत ना मित्र सुखाचा, खरें सांगतों हें ऐका प्रभू ख्रिस्ताचें सत्य भक्त जे, सांवरतील ते हें ऐका ... ४ येशुरुधिरें तारण मिळतें, त्रिवार सत्यची हें ऐका अनंत सुखधामाप्रत जाया, ख्रिस्त सुपथ हा हें ऐका ... ५ ---------- शं. ब. कुलकर्णी