७४८. लहान वाटसरु

मराठी

७४८. लहान वाटसरु किती मुले लेकरे स्वर्गलोकां चालती तीं येशूची कोकरें, त्याला अनुसरतो येशू करी प्रीती फार, जागा देई लेकरांस, उघडी मोत्यांचे दार या लहान वाटसरांस ... १ कोठुनी हे समुदाय स्वर्गलोकां चालती ऐका, तींच मुले काय एकमेकां संगतीं, आलों मी चिनाहूनि, इंग्लंडी मी जन्मलों मी अमेरिकेहूनी, मी लंकेत राहिलो ... २ कष्टें मार्गीं चालले, टाळले जगाचें हाल शेवटाला पोंचले, हर्ष होई सर्वकाल येशू करी प्रीती फार, जागा देई लेकरांस, उघडी मोत्यांचे दार या लहान वाटसरांस ... ३ -------- एच. बॅलेंटाइन