मराठी
७४९. खरें प्रेम असावें
असावें प्रेम खरें
व्यर्थ नको न खरें नखरे ... ध्रु
मोर पिसारा लावूनी सजला
काक करी न खरें नखरे ... १
लोभावीण जेन प्रेम असे बा
त्यासी म्हणावे प्रेम खरें ... २
कृत्रिम खोट्या प्रेमा दावुनी
व्यर्थ बुडालीं कैक घरें ... ३
------------ दि. मे. धिवर