मराठी
७५०. दहा आज्ञा
देव एकच मी,अन्य तुज नसावा
मूर्तिपूजेचा वीट तूं करावा
नाम देवाचें व्यर्थ नको बोलूं
नको केव्हां दीन प्रभूचा विटाळू ... १
आईबापां सन्मान नित्य देई
जीव मनुजाचा कदापि न घेई
कर्म व्यभिचाराचें नच मुळीं करावें
चोरीपासूनिया दूर तूं रहावें ... २
साक्ष खोटी ती देउ नको केव्हां
लोभ परक्याचा वस्तूचा नसावा
जरी शेजारी सुखी, नको हेवा
असा वागत जा नित्य स्मरून देवा ... ३
------------- आप्पाजी पाठक