मराठी
७५२. प्रभूचे अवतार
जाऊं चला या, जाऊ बघाया
प्रभूच्या अवतरलेल्या मूर्ती ... ध्रु
हात पसरला ह्या अंधांनी,
तिकडे सुरे दुःखे कण्हती... १
ह्या वृद्धा नाच मुलें माणसें,
आईबाप ह्या तान्ह्या नसती ... २
कितीत दिवस अन्नावाचून हा,
चिंध्या त्याच्या अंगावरती ... 3
हेच आपुले सखे सोयरे
प्रभूची हीं का रूपें नसती ... ४
स्वागत करू या ह्या आप्तांचे
प्रभुराया होईल तोष किती ... ५
नाहीं म्हणू नका, चला पुढें या,
प्रेमच प्रभूचें दावूं जगतीं ... ६
------------- दे. ना. टिळक