मराठी
७५३. समापन
अखिल विश्वपाला आसरा अन्य नसे बाला
तुजवांचूनि जगणें पुरें हें, फार बरे मरणे
तुजवांचूनि मरणें नको बा व्याकुल भीतीने
तुजवांचूनि जगतीं गमे मज निरर्थ निष्फल ती
तुजवांचूनि स्वर्ग नको मज नको अन्य मार्ग
चाल बदलून
तूंच प्रभो ताता धांव या उद्धारी पतिता
शरण तुला बापा प्रभो ये वारी भवतापा
तुझ्या भजन ध्यानी
सरो मम दिवस तशी रजनी
जीवित मम सकाळ होऊं दे तुझीच पदधुळ
विश्वपालका, विश्व् सकल हे, गात तुझी कीर्ती
जयजयकारे तुझ्या भरो हि मधुनादें जगती
----- वेणूबाई मोडक