. ख्रिस्ती यत्न करणाऱ्यांचे संमेलन

मराठी

७५५ . ख्रिस्ती यत्न करणाऱ्यांचे संमेलन या हो, या हो, या हो, प्रियजन यत्नां साधूं, या हो अनुदिन ख्रिस्ती कार्यें परमहीतें परिणत, अभिमत देवातें ... ध्रु ख्रिस्त पुढें हा सेनानी रत आपण सारे अनुगमनी मित्र समसतां तो मानी, प्रभूवर करी निजकार्यातें या हो, भयहत सारें जग अधभारे अवनत बोलावी गर्जा जय जय आनंदें सारें प्रभुचरणीं साधें पावे अध लय, लोपे मृतिभय, ऐशा शुभमय यत्नांतें अविरत करुं करुं निज हृदिं धरूं धरूं प्रियतम निजगुरूरायातें ... १ ---- ना. वा. टिळक