७५६. यात्रिकांस आमंत्रण

मराठी

७५६. यात्रिकांस आमंत्रण या चला चला, चला काल्वरी जाऊं प्रेम खिळलेलें पाहुं ... ध्रु गिरि मधुमंगल हा भारी चढला प्रभू जनकैवारी सकलांना तो पाचारी निज सुमनां तत्पदी वाहूं ... १ मोदें हे जीवन नाचें घ्या दर्शन घ्या तीर्थाचें शांतीचें, सतसौख्याचें प्रेमभरे अमृत सेवूं ... २ रुधिराची गंगाजमुना हि वाहे झुळू झुळू भुवना पतितांनां दे संजीवना या चला तिजमध्यें न्हाऊ ... ३ पापाचें ओझें अपुलें प्रभू खांबी घेऊन गेले नेलें हो वाहूं नेलें उद्धरिलें अपणा, गाऊं ... ४ घ्या वधस्तंभ निजस्कंधीं गा जय जय ख्रिस्तानंदीं वाजवा टाळ मृदुछंदी हि दिंडीं प्रभुपदीं नेऊं ... ५ ----- वा. स. निर्मळकर