मराठी
७५७. बंधूंचें मिळणें
ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा
भक्ती भाव भोळा पाहीं देवा ... १
आवडे तुला रे नाद गायनाचा
टाळ मृदूंगाचा नाही वीट ... २
नाचले तुझे ते थोर साधूसंत
तुझ्या कीर्तनांत ओढी आम्हां ... ३
रंगू दे आम्हांला रिंगणांत गोल
गाऊं दे अमोल प्रेमगीत ... ४
गोड गाणीं गातां होऊं पायिं लीन
गाऊं या मिळून देवबापा ... ५
------- वा. स. निर्मळकर