७६०. ख्रिस्तराज्याची सुवार्ता

मराठी

७६०. ख्रिस्तराज्याची सुवार्ता ख्रिस्तराज्याची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलूया, हालेलूया, गौरवें गर्जाल का ... ध्रु घ्या वीणा हाती ताल मृदूंग, आळवा प्रेमें होऊन दंग, त्या प्रभूचा थोर महिमा गौण दावाल का ... १ संकटें येतां जो करी साथ येई धांवोनि दे झणीं हात त्या प्रभूला प्रेमभावे अंतरी ठेवाल का ... २ दाविली प्रीती, त्यागुनी प्राण जिंकिलें वेगें, मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का ... ३ या अहो कष्टी, या भाराक्रांत घ्या विसावा घ्या, सौख्य नितान्त दीनबंधू ह्या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का ... ४ ------- जयन्त भाम्बल