७६१. सुवार्तिकास

मराठी

७६१. सुवार्तिकास सहन करा अपमान जीवाचें रान करा सारे प्रभू ख्रिस्ताचे प्रतापशाली सेवकगण व्हा रे हसा खदखदां नसानसांतून संजीवन भरलें अनंत काली निश्चिन्त असा, चिंताढग विरले चला करा जयघोष भरा संतोष जगिं सगळे नवजोमानें जगास सांगा भय अवघे हरले अहा उगवली उषा नभांतून, अहा आस उमलली जगांतून, प्रभा फांकली ढगांढगांतून रड्या, उगा कां फुका रड अशी, होई गड्या हसरा, बघ झाडाला चौघडा, फडकला ध्वज, फिरला वारा ----- स. ना. सूर्यवंशी