मराठी
७६२. पेरणी
या हो या अफाट धरणीमाजी
वार्ता पेराया
पेराया जटीली अंतर्यामी
मुक्ती पेराया ... ध्रु
रोपाया कंटकमय
हीं रानें दिसती वैराण
वैराण वृथाभिमानधरांचे
डोंगर मस्तान ... १
मस्तान व्यग्र, निराश मनांच्या
खांचा पंकील
पंकील मृषानैश्चर्याचें
गारुड बेताल ... २
बेताल कुणी न पुसतें
देवा धर्म सुवृत्ता
सुवृत्ता अनेक तारणवाटा
सुटल्या धीमंतां ... ३
धीमंतां कृषिक होऊन
नांगर हंकू नेटानें
नेटाने मनोभूमीची कापूं
सारी वैगुण्ये ... ४
वैगुण्ये सुपीक बनवूं शेतें
संतत कष्टाने
कष्टाने धर्मजलें पाझरता
वारुणी मेघाने ... ५
मेघाने कृपांबुवर्षण केलें
काळें आकाश
आकाश इंद्रधनूच्या
वर्णे दावी संतोष ... ६
संतोष जयघोषाच्या
नादीं लागू पेराया
पेराया अमोल बीं
ख्रिस्ताचे आत्मे जिंकाया ... ७
जिंकाया त्वरा करोनि
वेगें साधूं आघाडी
आघाडी उभा जगाचा स्वामी
अपुला सवंगडी ... ८
सवंगडी परितोषिक कष्टाचें
देई भक्ताला
भक्ताला परिहारुन तापाला,
पुसून धर्मजला ... ९
------ में. दा. पाटोळे